Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 6 July 2018

जनजागृती कार्यक्रम

जनजागृती कार्यक्रम दिनांक :-6.7.2018

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लासलगाव पोलिस स्टेशनच्या वतीने जनजागृती कार्यक्रम

                         विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लासलगाव दलामार्फत नागरिकांना अफवांबाबत जागृत करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी लासलगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री.सोनवणे साहेब यांनी अफवा न पसरवण्याबाबत विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्या मनोगतातून व्यक्त केले.त्यानंतर विंचूर गावचे ग्रामस्थ श्री.रणजीत गुंजाळ यांनी देखील आपल्या मनोगतातून सामाजिक सलोखा जपणूक करण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमास लासलगाव पोलिस स्टेशनचे श्री.घुगे दादा, श्री.सांगळे दादा, पत्रकार श्री.डी.बी.काद्री, ग्रामस्थ, पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी., शिक्षक श्री.पाटील के.डी, श्री.सरोदे पी.ए, श्री.निकम एम.एस., सेवकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी.यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के. यांनी केले.










No comments:

Post a Comment