पालक शिक्षक संघाची स्थापना
दिनांक : १४.७.२०१८ वार :- शनिवार
विंचूर विद्यालयात शिक्षक पालक
संघाची स्थापना..........
उपाध्यक्षपदी श्री.शंकर दरेकर यांची निवड
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव
पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात
आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे
उपशिक्षक श्री.चांदे आर.के. यांनी पालक शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू व
उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. हे
कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.नारायणे गुरुजी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री.पोफळे जी.जी., उपाध्यक्ष श्री.शंकर
दरेकर, सचिव श्री.पवार एस.एम., सहसचिव सौ.मोनिका कल्याणकर व डॉ.चंद्रकांत ठाकरे यांची
निवड करण्यात आली. गुरुकुल प्रकल्पाच्या सहसचिव पदी श्री.बाबासाहेब आरगडे याची
देखील निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील उपाध्यक्ष श्री.संजय विठ्ठल
शिरसाठ व कार्यकारिणीचे आभार व्यक्त करण्यात आले व नवीन कार्यकारिणीचे विद्यालयाचे
प्राचार्य श्री.पोफळे जी.जी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे. डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार
एस.पी. यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यानंतर विद्यालयातील गुरुकुल प्रमुख श्री.निकम एम.एस. यांनी गुरुकुल
प्रकल्पाविषयी सखोल माहिती दिली. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.जोपळे के.जी. यांनी
विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या
यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन
केले. यानंतर पालक प्रतिनिधी श्री.आबा दरेकर, श्री.ज्ञानेश्वर खांदोडे,
श्री.सूर्यभान जाधव यांनी विद्यालयाचे नावलौकिक मोठे करण्याचे आव्हान केले. या
सभेस श्री.आबा दरेकर, श्री.ज्ञानेश्वर दरेकर, सौ.पूजा करमासे, श्री.प्रभाकर जाधव व
पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पाटील जे.पी. व
आभार प्रदर्शन श्री.पाटील के.डी. यांनी केले.
No comments:
Post a Comment