गुरुपौर्णिमा :- दिनांक २७.०७.२०१८
विंचूर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी .............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात
गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इयत्ता १० वी अ च्या
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. प्रथम अध्यक्ष निवडीची सूचना अविनाश खैरे याने
मांडली त्यास सर्वानुमते अनुमोदन कु.कोमल वाजे हिने दिले. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. व
व्यासपीठावरील मान्यवरांनी महर्षी व्यास व कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कु.साक्षी दरेकर हीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी प्राचार्य व सर्व
सेवकांचे औक्षण केले व भेटवस्तू दिल्या. यानंतर विद्यालयातील विद्यार्थी कु.निकिता
सुपेकर, कु.पल्लवी जाधव, कु.शुभांगी चौधरी, शुभम सोनवणे, कु.वैभवी पवार, कु.श्रद्धा
हुजबंद, कु.श्रुती जोशी, जयदीप काशीकर, राहुल कानडे, हर्षद जेऊघाले, गुरुमुख गडाख,
प्रथमेश राऊत यांनी आपल्या मनोगतातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरुंबद्दल ऋण
व्यक्त केले. तसेच विद्यालयातील उपशिक्षक व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.चांदे
आर.के. यांनी गुरुपौर्णिमा का साजरी करतात याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कु.पल्लवी जाधव, कु.प्रेरणा जाधव व हृषीराज देवरे यांनी केले व आभार
प्रदर्शन कु. साक्षी नेवगे हिने केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल
सर्व विद्यार्थी, शिक्षक व सांस्कृतिक विभाग यांचे विद्यालयाचे पर्यवेक्षक
श्री.पगार एस.पी. यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
nice sir....
ReplyDelete