Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 19 August 2018

शिक्षक पालक संघ -उच्च माध्यमिक



शिक्षक पालक संघ -उच्च माध्यमिक 

विंचूर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक संघाची स्थापना     
उपाध्यक्षपदी श्री. जेऊघाले विनायक यांची निवड                               
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक पालक संघाची स्थापना व कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे उच्च माध्यमिक शिक्षक एस.डी.शिंदे यांनी पालक-शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू, उद्दिष्टे स्पष्ट केली. प्राचार्य जी.जी.पोफळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य जी. जी. पोफळे, उपाध्यक्ष विनायक जेऊघाले, सचिव यु.बी.वर्पे सर सहसचिव म्हणून किशोरकुमार गाकर व सौ. निकाळे ताई यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणीचे एस. एन.शेवाळे एन. टी. बिरारी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यालयाचे उपशिक्षक टी. .पवार यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विविध उपक्रम विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. यानंतर पालक प्रतिनिधी ज्ञानेश्वर नागरे, दत्तात्रेय जेऊघाले, शंकर डुंबरे यांनी विद्यालयाचे नाव लौकिक मोठे करण्याचे आव्हान केले. या सभेस शंकराव दरेकर, ज्ञानेश्वर पुंड, अरुण श्रींग, मुदगुल व पालक व उच्च माध्यमिक सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस.डी.शिंदे व आभार प्रदर्शन एस.एन.शेवाळे यांनी केले .
















No comments:

Post a Comment