विंचूर विद्यालयातील अभिषेक राजेंद्र कातकाडे याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
पिंपळगाव बसवंत ता.निफाड येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका
स्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील अभिषेक राजेंद्र
कातकाडे याने १४ वर्षीय ३५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे आता
त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यालयाचे प्राचार्य
श्री.जी.जी. पोफळे, उपमुख्याध्यापक श्री.डी.सी.लाटे, पर्यवेक्षक श्री.एस.पी. पगार,
क्रीडा विभाग प्रमुख श्री. के.डी. पाटील , स्थानिक सल्लागार शिक्षण समिती सदस्य,
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment