Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 6 September 2018

5 सप्टेंबर - शिक्षक दिन

5 सप्टेंबर - शिक्षक दिन

विंचूर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.........

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता १० वी च्या वर्गातील उस्फुर्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिपाई म्हणून एक दिवस शाळेचे संपूर्ण कामकाज बघितले. इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनी कु.रिया भट्टड – मुख्याध्यापक,  ओंकार सांगळे – उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक म्हणून सुयश मुदगुल आणि पूनम ठाकरे यांनी कामकाज पाहिले. सकाळ व दुपार सत्रात अध्यापनाचे कामकाज पार पडले. त्यानंतर सभेचा व सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य पोफळे जी.जी. यांनी भूषविले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषीराज देवरे याने केले. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थी शिक्षकांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी विद्यालयातील सर्व वर्गाना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण व पर्यवेक्षक एस.पी.पगार यांनी कौतुक केले. त्यानंतर गोपाळ मुदगुल, रोहित दरेकर, श्रद्धा हुजबंद, शितल गरड, प्रांजल दरेकर, समृद्धी महाले, शुभम क्षिरसागर यांनी शिक्षक दिनानिमित्त आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयाचे उपशिक्षक आर.के.चांदे, के.जी.जोपळे  यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मेहनतीचे व स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रेरणा जाधव व पल्लवी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल चव्हाण हिने केले. शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास उपशिक्षक बी.ए.शेलार, के.डी.पाटील, व्ही.एस.कुलकर्णी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. माध्यमिक साठी पी.ए.सरोदे तर उच्च माध्यमिक वर्गासाठी टी.ए. पवार व बी.एस.क्षिरसागर यांनी शिक्षक दिनाचे नियोजन केले.





































































































No comments:

Post a Comment