विंचुर
विद्यालयात विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन...
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विशेष
गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती निफाड येथील विशेष शिक्षिका पल्लवी भामरे
यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय सुविधा तसेच डॉक्टर हेलन
केलर यांचे प्रेरणादायी कार्य यासंबंधी माहिती दिली. अशा विद्यार्थ्यांनी विविध
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे,
त्यांचा आत्मविश्वास व मनोबल वाढवावे यासंबंधी मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व
विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी सहकार्याने वागावे असे त्यांनी यावेळी आवाहन
केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे होते. या
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डी.सी. लाटे, पर्यवेक्षक एस.पी.पगार, शिक्षक-शिक्षकेतर
कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ के.एम.निकम व
आभार प्रदर्शन एम.एम. पवार यांनी केले.
No comments:
Post a Comment