व्याख्यान- श्री.अनंतजी राऊत दिनांक :- २८.०८.२०१८
विंचुर विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत प्रसिद्ध व्याख्याते अनंत राऊत यांचे व्याख्यान....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्याते अनंतजी राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी अनंत राऊत यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आई-वडीलांचे जीवनातील महत्त्व आपल्या हृदयस्पर्शी कवितांतून स्पष्ट केले. तसेच मानवता जगातील सर्वात मोठा धर्म आहे हा संदेश दिला. आधुनिक जीवनातील विविध प्रसंगाच्या आधारे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच ध्येय ठेवावे व त्यानुसार प्रयत्न करावे असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य जी.जी. पोफळे होते. सूत्रसंचालन आर.के.चांदे व आभारप्रदर्शन एम.एस.निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ए.जे.म्हस्के, ए.एच.पाटील, जे.पी.पाटील यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक डी.सी.लाटे पर्यवेक्षक एस.पी.पगार, ज्येष्ठ शिक्षक घुमटकर बी.एस., सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
No comments:
Post a Comment