Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, 28 August 2018

रक्षाबंधन

रक्षाबंधन

विंचुर विद्यालयात वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये रक्षाबंधन सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व मुलीनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्याना राख्या बांधल्या. तसेच विद्यालयातील महिला शिक्षकांनी देखील शिक्षकांना राख्या बांधल्या. विद्यालयातील जेष्ठशिक्षक बी.एस.घुमटकर यांनी रक्षाबंधनाचे महत्व व बहीण-भाऊ यांतील असलेल्या पवित्र नात्यांसंबंधी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरातील सर्व वृक्षांचे पूजन करून रक्षाबंधन केले व त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली. विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक डी.सी.लाटे व पर्यवेक्षक एस.पी. पगार यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. उपशिक्षक आर.के.चांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले






















No comments:

Post a Comment