विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाशिक येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. शुभम दरेकर, प्रथमेश कुसळकर, अनिकेत गुजर, सुरज गलांडे, समाधान तिपायले, सुरज गरड, जयेश गायकवाड, मोनिका दरेकर, निकिता घायाळ, स्नेहल वाकचौरे, ईशा कबाडी यांनी गोल्ड मेडल तर साई उगले, रोहित गलांडे, ज्ञानेश्वर काकड, सोहम कबाडी यांनी सिल्व्हर मेडल पटकावले. विद्यालयातील या १५ विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल प्राचार्य जी.जी.पोफळे, उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, व्ही.व्ही.मापारी, क्रीडा विभाग प्रमुख के.डी.पाटील, आर.के.चांदे, सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment