२२ सप्टेंबर - कर्मवीर जयंती
विंचूर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रथम कर्मवीरांच्या मुख्य रथाचे व प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ.ताराबाई क्षिरसागर, केशव क्षिरसागर, सल्लागार समिती सदस्य श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.नारायणे गुरुजी, अनिल दरेकर, विनायक जेऊघाले, पी. के. जेऊघाले, सतिष शेलार, बाबा आरगडे, शंकर दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर गावातून कर्मवीरांच्या प्रतिमेची ढोल – ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध समाजप्रबोधनपर देखावे दाखविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लेझीम पथक, कलशधारी विद्यार्थिनी, वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, रिंगपथक, डम्बेल्स, घुंगुरकाठी, लेक वाचवा, शेतकरी वाचवा, स्त्री-भृणहत्या, स्वच्छता अभियान, सर्व धर्म समभाव, अंधश्रद्धा निर्मुलन, विविध देशभक्त, संत, देव यांचे देखावे , इंधन वाचवा, भजनी मंडळ, वारकरी दिंडी अशा विविध देखावे, रथ व नृत्यांचा समावेश होता.
मिरवणुकीनंतर जयंती सोहळा निमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवडीची सूचना उपशिक्षक पी.ए. सरोदे यांनी मांडली व त्यास जेष्ठशिक्षक के.डी.पाटील यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षस्थानी उत्तर विभाग सल्लागार समितीचे सदस्य नारायणे गुरुजी होते. त्यानंतर कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. व्यासपीठावरील मान्यवर व मिरवणुकीस सहकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व विद्यालयाचे उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्य, संस्था वाटचाल याबद्दलची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शन उपशिक्षक ए.एच.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक आर.के.चांदे व उपशिक्षिका बी.आर.नागणे यांनी केले. सदर कार्यक्रम नियोजनानुसार यशस्वी पार पडल्याबद्दल प्राचार्य जी.जी. पोफळे , उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, व्ही.व्ही.मापारी यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment