विंचूर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश संपादन करून विभागीय पातळीवर जाण्याचा बहुमान मिळवला. यामध्ये 14 वर्षाखालील गटात हरी साताळे, शुभम दरेकर, ओम कुमावत यांनी प्रथम क्रमांक तर रोहित गलांडे याने द्वितीय क्रमांक मिळवला. 17 वर्षाखालील गटात ज्ञानेश्वर काकड याने द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी .जी. पोफळे, उपमुख्याध्यापक पी.जी. ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, क्रिडा विभाग प्रमुख के.डी. पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment