विंचुर विद्यालयाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्मार्ट स्कूल मानांकन पारितोषिक
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास नुकताच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत स्मार्ट स्कूल पारितोषिक जाहीर झाले. इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत हे पारितोषिक माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख व सन्मानचिन्ह असे आहे. विद्यालयाला पुरस्कार मिळाल्याबद्दल स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ व सर्व सदस्य यांनी प्राचार्य जी.जी. पोफळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment