विंचूर विद्यालयाची वनभोजन सहल व गुरुकुल क्षेत्रभेट संपन्न........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १० वी अखेर सर्व वर्गाची वनभोजन सहल व गुरुकुल प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट एम.आय.डी.सी. विंचूर येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कारखान्यांना भेट देऊन माहिती मिळवली. गुरुकुल प्रकल्पातील सर्व विद्यार्थ्यांना मा.श्री.गायकवाड डी.के. साहेब व्यवस्थापक, गुड ड्रॉप वाईन सेलर प्रा.लि. एम.आय.डी.सी., विंचूर व त्यांचे सहकारी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी वनभोजनाचा आनंद लुटला. वनभोजनाचे नियोजन उपशिक्षक जे.पी.पाटील व क्षेत्रभेटीचे नियोजन पी.ए.सरोदे यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक पी.जी.ढवण, पर्यवेक्षक एस.पी.पगार, के.डी.पाटील, आर.के.चांदे, गुरुकुल प्रमुख एम.एस.निकम, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment