Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

 *विंचूर विद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाच्या उपशिक्षिका ए.वाय. सावळे यांनी आंबेडकरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी अतिशय समर्पक शब्दात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य व त्यांचे समाजासाठीचे योगदान सविस्तरपणे आपल्या मनोगताद्वारे मांडले. याप्रसंगी रमाबाई महिला मंडळ विंचूर च्या अध्यक्षा वत्सलाबाई काळे, यशोधराबाई निकाळे, मनीषा डावरे, सीमा निकाळे, शैलजा वाघ, इंदुबाई रुपवते यांनी विद्यालयात कार्यक्रमास उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर गीत गायन सादर केले. विद्यालयाचे प्राचार्य यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी केले.




















No comments:

Post a Comment