Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 10 August 2018

स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद


 स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद                 दिनांक :-  ०३/०८/२०१८

 विंचूर विद्यालयात स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न....
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नुकतेच स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद अंतर्गत शाहीर श्री. विक्रम खरात यांनी एकपात्रीनाटक, अभिनय व गीते सादर केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षिका सौ.पवार ए.ए. यांनी मेहनत घेतली. अतिशय चांगल्या व ओघवत्या भाषेत अभिनय व गीतांसह शाहीर श्री.विक्रम खरात यांनी परिपाठाच्या वेळीस्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, एड्स जनजागृती, शिक्षणाचे महत्त्व, बेटी बचाव-बेटी पढाओ, जादूचे प्रयोग, पोवाडे, भारुड, विनोद इ. विषय व लोककलांच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनात प्रकाश टाकणारा कार्यक्रम सादर केला. त्यांच्या सुरेख आवाजात व विनोदी शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन व प्रबोधन केले.त्यांनी सादरकेलेल्या या नाटकाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व विद्यालयाचे प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांनी कौतुक केले.


















No comments:

Post a Comment