लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती दिनांक १/८/२०१८
विंचूर
विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी...........
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व
अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता १० वी ब च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन
केले. याप्रसंगी सर्वप्रथम अध्यक्ष पदाची सूचना कु.निकिता घायाळ हिने मांडली व
त्यास सर्वानुमते कु.अपेक्षा म्हसकर हिने अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे
प्राचार्य सन्माननीय श्री.पोफळे जी.जी. व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते टिळकांच्या
व अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.
वैष्णवी सालगुडे हिने केले. यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी कुंदन
सहानखोरे, पंकज म्हसकर, कु.माधुरी सुराशे, आदेश मुदगुल, कु.आकांक्षा कातकाडे, जोएफ
शहा इ. नी भाषणे केली. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. घुमटकर बी.एस. व सौ. पाटील
ए. सी. यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत
व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता शिळमकर व कु.आचल जेऊघाले यांनी केले
व आभार प्रदर्शन गोकुळ पाडेकर याने केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना
श्री.चांदे आर.के. व श्री.भोसले व्ही.सी. यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक
श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी., श्री.पाटील के.डी., श्री.गाडेकर
एस.पी, श्री.जोपळे के.जी., सर्व शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment