Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 15 August 2018

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन


 स्वातंत्र्यदिन -  १५ ऑगस्ट

विंचूर विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..............
            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये ७२ वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड व एमसीसी संचलनद्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लास्टिक मुक्त भारत जनजागृतीसाठी मोटारसायकल व सायकल रॅली काढण्यात आली. प्रभातफेरी नंतर कु.दिशा कदम व प्रीती कदम या मुलीनी आपले मनोगत केले. त्यानंतर तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत तंबाखू मुक्तची सर्वानी शपथ घेतली. १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस याप्रसंगी साजरा करण्यात आला. तसेच विद्यालयातील गरीब व दिव्यांग विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांमार्फत, गरीब विद्यार्थी फंड यांचे मार्फत मोफत गणवेश वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थ व गावातील दानशूर व्यक्तींकडून याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ व गोळ्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य  सुनिलभाऊ मालपाणी, गोपीनाथ ढवण, जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष शंकर दरेकर व विनायक जेऊघाले, ग्रामस्थ दिनकर चव्हाण, के.के.जेऊघाले, नरसिंह दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, आबा दरेकर, किशोर गावकर, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रभातफेरीचे संचालन के.डी.पाटील तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.पी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल पर्यवेक्षक एस.पी.पगार, उपमुख्याध्यापक डी.सी.लाटे, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आव्हाड सर, प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी सर्वांचे आभार मानले.


















































1 comment: